Squaring the circle/ए पी जे अब्दुल कलाम*अरुण तिवारी/मराठी अनुवाद*संजय माळी /बुकगंगा पब्लिकेशन्स
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि डॉ. अरुण तिवारी लिखित 'स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस' या उल्लेखनीय दर्जेदार ग्रंथाचा मराठी अनुवाद बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे या संस्थेने नुकताच प्रकाशित केला आहे. या मराठी अनुवादाचे नाव 'स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस - भारतीय प्रबोधनपर्व वैभवशाली भारताची आगामी दिशा' असे असून तो मी केला आहे. ह्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथाचा सार्वजनिक प्रकाशन सोहळा नगर वाचनालय, कुरुंदवाड येथे दि. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी संपन्न झाला.